Home स्टोरी मिलाग्रीस प्रशालेमध्ये राज्य क्रीडा दिन व मकरसंक्रांती उत्साहात साजरा…!

मिलाग्रीस प्रशालेमध्ये राज्य क्रीडा दिन व मकरसंक्रांती उत्साहात साजरा…!

192

सावंतवाडी: दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये महाराष्ट्राचे कुस्तीपटू व ऑलम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी भार्गवी शेटेवे हिने खाशाबा जाधव यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी देखील खाशाबा जाधव यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.व आपल्या जीवनात खेळाचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

त्याचप्रमाणे मकरसंक्रांती हा सण सुद्धा प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा मध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडविले ‌. व सर्वाना तिळगुळ देऊन तोंड गोड केले.प्रशालेची विद्यार्थिनी अवनी भांगले हिने या सणाचे महत्त्व सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी देखील मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या शिक्षिका सौ. शारदा गावडे यांनी केले.अशाप्रकारे उत्साहात हे कार्यक्रम प्रशालेमध्ये संपन्न झाले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, तसेच पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.