सावंतवाडी: दि.६ जानेवारी २०२४ रोजी फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून मिलाग्रिस हायस्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत P.T.Display हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग डायोसिएशन एज्युकेशनल ट्रस्ट , सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष रेव्ह. बिशप ऑल्विन बरॅटो, रेव्ह.फादर फेलिक्स लोबो (सचिव , सिंधुदुर्ग डायोसिएशन एज्युकेशनल ट्रस्ट, सिंधुदुर्ग) ,रेव्ह.फादर मिलेट डिसोझा ( मॅनेजर), प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,मराठी प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी, पालकमंत्री श्री.रविंद्र चव्हाण, केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर ,युवा उद्योजक श्री.विशाल परब ,युवा उद्योजिका सौ.वेदिका परब ,माजी आमदार श्री.राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,माजी नगराध्यक्ष श्री संजु परब ,माजी शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक पालक समिती सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्षभरामध्ये खेळ,शिक्षण व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या मिलाग्रिस हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राईट रेव्ह.बिशप ऑल्विन बरॅटो यांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.वार्षिक स्नेहसंमेलन हा प्रत्येक मुलाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो व हा क्षण निर्माण करुन देणाऱ्या गुरुजन वर्गाचे कौतुक केले पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण यांनी केले. तसेच भविष्यात या शाळेला काहीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन प्रसिद्ध युवा उद्योजक श्री.विशाल परब यांनी दिले.
आपण ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शाळेने आपल्याला मोठं केलं त्याच शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरुन विद्यार्थ्यांना बक्षिस देताना आपल्याला फार आनंद होत आहे अशा भावना प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि उद्योजिका सौ.वेदिका परब यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेज ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रतिथयश शाळा असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उपक्रम नेहमीच राबवित असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सारखी नसते तसेच प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला, निरनिराळे कौशल्य लपलेले असते. ते शोधून काढण्यासाठी सर्व कौशल्यांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांमधील कलेचे चीज व्हावे.
आजच्या या P. T. Display कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हेच आहे की, प्रत्येक विद्यार्थ्यांला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी प्रत्येकाला यात सहभागी करून घेतले आहे. एकूण 1400 विद्यार्थ्यांची कला आज आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत असे प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फा. रिचर्ड सालदान्हा यांनी केले.
मिलाग्रिस शाळेच्या P T display या कार्यक्रमामध्ये प्रथमच प्रशालेचे 1400 विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार तसेच मल्लखांब सारखी कौशल्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली.या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे वरिष्ठ लिपिक सौ.मिशेल लेमॉस ,कनिष्ठ लिपिक श्री.जयदेव मणेरकर तसेच प्राध्यापिका सौ.प्रिया अब्राहम यांनी केले.तर आभार प्रशालेच्या शिक्षिका सौ. शेरॉन अल्फान्सो यांनी व्यक्त केले.अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.