Home स्टोरी मिडियावर हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई...

मिडियावर हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करा : प्राचार्यांना निवेदन

214

अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा : मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी.

सावंतवाडी: वादग्रस्त पोस्ट प्रकरणाला शेकडोंच्या संख्येने हिंदू धर्मीय एकवटले आहेत. सोशल मिडियावर हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणाऱ्या त्या युवकासह ती शेअर करणाऱ्या संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनीवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली.

 

तसेच महाविद्यालयातून हे सर्व हिंदू धर्मीय रॅलीने शहरातून नगरपालिकेच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी हिंदू धर्मिय मोठ्या संख्येने उपस्थित होते यात महिलांचाही मोठा सहभाग होता. नगरपालिकेत आल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत शहरातील अनधिकृत परप्रांतिय फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच फेरीवाले यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. ही कारवाई करताना स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घ्या. असेही यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सुचविले.

 

अनधिकृत फेरीवाल्यांची यापूर्वी यादी तयार करण्यात आली या यादीप्रमाणे करा,अशी मागणी यावेळी संजू परब यांनी केली. सावंतवाडी नगरपालिकेच्या जिमखाना व्यायाम शाळेतील प्रशिक्षक त्वरित बदला अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी नगरपालिका आवारात हिंदू धर्मियांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. यानंतर हा मोर्चा सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे वळला तिथे पोलिसांनाही निवेदन सादर करण्यात आले.