पुणे: पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडले गेल्यावर त्याच्या शेजारच्या साखरमाची गावाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळ विस्थापित करण्यात आले. तेथे त्यांच्या घरांसाठी देण्यात आलेला ४३ लाख रुपयांचा निधी वनविभागाच्या ठेकेदाराने घेतला. घरांऐवजी त्यांना पोल्ट्री फार्म भाड्याने घेऊन तेथे २२ कुटुंबांची सोय केली. आंदोलने, उपोषणे करूनही ठेकेदाराच्या विरोधात कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ‘माळीणच्या गावकर्यांसमवेत आम्हीही मेलो असतो, तर बरे झाले असते’, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.