Home स्टोरी माळगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

माळगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

93

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत माळगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सरपंच सौ चैताली चेतन साळकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल श्री नांदोसकर यांनी व्यसनमुक्ती बाबत तर श्रीमती रसाळ यांनी आरोग्य विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने श्रीमती सुषमा धामापूरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी टी बी मुक्त शपथ घेण्यात आली. बचत गटांना पूरक साहित्य मिळाल्या बद्दल सीआरपी स्नेहल संतोष चव्हाण यांनी तर फळझाड लागवड साठी अमित ठाकूर, मातृवंदना लाभार्थी मनस्वी परब यांनी सरकारचे आभार मानले. यावेळी आयुष्यमान भारत कार्ड आणि उजवला गॅस लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, चेतन साळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी सरपंच निलेश खोत, ग्रा सदस्या सेजल परब, अंकिता कासले, राजश्री शेलार, पोलीस पाटील किशोर जाधव तसेच ग्रामस्थ, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन गुरुनाथ ताम्हणकर तर आभार ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी मानले.