सिंधुदुर्ग:
माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला माळगाव पंचक्रोशीतील माळगाव, वेरली, वडाचापाट, बिळवस या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
ग्रामस्तरीय रंगभरण स्पर्धा निकाल-
गट १) इयत्ता पहिली दुसरी-
प्रथम: पियुषा राजेश लब्दे (भोगलेवाडी), इशा रत्न सुर्वे (लाटकोंड)
द्वितीय: स्वरा प्रदीप पालव (बिळवस देऊळवाडा), आरोही मंगेश पाटकर (वडाचापाट)
तृतीय: गणेश विठ्ठल परब (भोगलेवाडी), ईशान उमेश कदम (वडाचापाट)
उत्तेजनार्थ: रुद्र राजन हरकुळकर (माळगाव नं.१), निशिका निलेश पालव (बिळवस नं.१), मोनिश वैभव मसुरकर (भोगलेवाडी).
गट २) इयत्ता तिसरी/चौथी-
प्रथम: राधिका चंद्रशेखर खाडीलकर (भोगलेवाडी), वैष्णवी नारायण कदम (लाटकोंड)
द्वितीय: जुईली राजन हरकुळकर (माळगाव नं.१), डॅलिशा डॅनी लोबो (वेरली)
तृतीय: अद्वय अनिल भोगले (भोगलेवाडी), सोनल विनायक माळकर (माळगाव नं.१)
उत्तेजनार्थ: सुरक्षा गणेश पालव (बिळवस देऊळवाडा), सरिता आनंद चौगुले (भोगलेवाडी)
या स्पर्धेमध्ये एकूण ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय माळगाव आयोजित ग्रामस्तरीय निबंध स्पर्धागट १) इयत्ता ५वी ते ७वी-
प्रथम: स्वरा सचिन परब (वेरली)
द्वितीय: सिद्धी नारायण पोयरेकर (वेरली)
तृतीय: शांताराम संतोष परब (माळगाव हायस्कूल)
उत्तेजनार्थ: नीरजा शाम मांजरेकर (वडाचापाट), समृद्धी गुरुनाथ परब (माळगाव हायस्कूल), स्वरा सुनिल भोगले (माळगाव हायस्कूल)
गट 2) इयत्ता ८ वी ते १०वी
प्रथम: लीशा निळकंठ हडकर (माळगाव हायस्कूल)
द्वितीय: पारस राजन परब (माळगाव हायस्कूल)
तृतीय: श्रावणी श्याम मांजरेकर (वडाचापाट हायस्कूल)
उत्तेजनार्थ: शीतल चेतन साळकर (माळगाव हायस्कूल)
या स्पर्धेत एकूण ३१ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचे संयोजन ग्रंथपाल तन्वी राणे, छाया नाईक, मनाली परब यांनी केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. अध्यक्ष श्री. अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, सदस्य महादेव सुर्वे, अरुण वझे, श्यामा चव्हाण, शितल मापारी, चंद्रकांत माळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.