‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई.
१४ ऑगस्ट वार्ता: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) पथकाने १३ ऑगस्टच्या पहाटे पुन्हा मालेगाव शहरातील मोमीनपुरा भागात रहाणारा आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी (‘पी.एफ्.आय.’शी) संबंधित गुफरान खान सुभान खान* याला कह्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात त्याची ५ घंटे चौकशी केली. ‘चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल’, असे सांगून त्याला सोडून देण्यात आले आहे.१. काही मासांपूर्वी आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) माध्यमातून ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली होती.
२. गुफरान खान सुभान खान याच्या घरी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास झाडाझडती घेत त्याला घरातून कह्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात नेले.
३. गुफरान हा भ्रमणभाषवरून परदेशातील कुणाला तरी संपर्क करतो, तसेच तो पी.एफ्.आय संघटनेचा सदस्य असून तो जिहादी तरुणांना शारीरिक प्रशिक्षण देण्याचे काम करत असल्याचा त्याच्यावर संशय होता.
४. यापूर्वी ‘एन्.आय.ए.’च्या अधिकार्यांनी धाड टाकून ‘पी.एफ्.आय.’शी संबंधित काही जिहादी कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर आतंकवादी संघटनांना साहाय्य करण्याच्या कारणावरून मधल्या काळामध्ये एकाला अटक करण्यात आली होती. मालेगाव येथे गेल्या वर्षी पी.एफ्.आय संघटनेविरुद्ध प्रविष्ट असलेल्या एका गुन्ह्यात गुफरान आरोपीही होता.
५. झाडाझडतीत ‘काही आक्षेपार्ह कागदपत्रे हाती लागली आहे का ?’, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.