सिंधुदुर्ग: पोईप येथील श्री. वेताळमंदिर, गोळवण चिरमुलेवाडी येथील श्री. कुंभादेवी मंदिर,गावराई जिरेवाडी येथील श्री. महापुरुष मंदिर, कुंदे गावडेवाडी येथील श्री विठ्ठलादेवी मंदिर येथे वर्धापन दिन व श्री. सत्यनारायण महापूजेस कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजय पालव, बाबली पालव, परशुराम नाईक,छोटू पालव,बाळा सांडव,दत्ता पोईपकर,बाळा पालव,आनंद चिरमुले,भाऊ चव्हाण,हरी वायंगणकर,संतोष सामंत,महेश परुळेकर,गुरु परुळेकर,रुपेश तायशेटे,विदेशी परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.