कट्टर राणे समर्थक मा. नगरसेवक लीलाधर पराडकर, मा. नगरसेवक बाबू कांदळकर, मा. नगरसेविका संतोषी कांदळकर शिवसेनेत दाखल.
आ. वैभव नाईक, युवानेते संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत.
मालवण: मालवण दांडी येथील कट्टर राणे समर्थक माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष लीलाधर पराडकर, माजी नगरसेवक संतोष उर्फ बाबू कांदळकर, माजी नगरसेविका संतोषी कांदळकर, भाजपच्या बूथ अध्यक्ष अंजली पराडकर यांच्यासमवेत शेकडो राणे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेना शाखा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी संदेश पारकर म्हणाले,एक माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानंतर त्याच्याच वॉर्डमधील भाजपचे आणि राणे समर्थक तीन माजी नगरसेवक शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेला आव्हान देण्याचे प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तितक्याच ताकदीने उत्तर दिले जाईल हे मालवण मधील पदाधिकारी व शिवसैनिकांनी दाखवून दिले. वैभव नाईक यांच्यासारख्या सर्वसामान्य नेतृत्वाला येथील जनतेने आमदार केले. अनेक आमिषे वैभव नाईक यांना आली परंतु ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. येथील जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रीक होणार आहे. आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. वैभव नाईक म्हणाले, शिवसेनेचे नाव गेले,चिन्ह गेले आणि सत्ता नसताना देखील उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हिच शिवसेना पक्षाची ताकद आहे. कोविड काळात उद्धवजींनी केलेले काम, तौक्ते वादळ काळात केलेली मदत हि जनता विसरणार नाही. नुकत्याच आलेल्या सर्वेत शिवसेनेचे ११ खासदार निवडून येतील असे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार गेले असले तरी शिवसेनेवर त्याचा काही फरक पडला नाही. त्यामुळे निवडणुका घ्यायला विलंब केला जातोय. मात्र ज्यावेळी निवडणुका घेतल्या जातील तेव्हा लोकांचा रोष तुम्हाला मतदानातून दिसेल असे सांगत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांना मान सन्मान दिला जाईल असे सांगितले. यावेळी डिक्रू फर्नांडीस, बुंवा फर्नांडीस,पॉली डिसोझा,लुसो फर्नांडीस, रोबर्ट काळसेकर, अंतोन काळसेकर, कौशिक खवणेकर, वैभव नागवेकर, बॉनी काळसेकर, मिल्टन काळसेकर, प्रमोद जोशी, भरत सारंग, किशोर सातोसकर, बंड्या सावजी, भाऊ आचरेकर, भाऊ मालंडकर, बबन तांडेल, संदीप मांडलिक, शशांक माने, शीतल तारी, नामदेव केळुसकर, प्रमोद तांडेल, निलेश आचरेकर यासंह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितीन वाळके ,माजी नगरसेवक यतीन खोत ,उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेश जावकर, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,किरण वाळके, तृप्ती मयेकर, सन्मेश परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत,तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका संघटक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, नीनाक्षी शिंदे,समीर लब्दे,बंड्या सरमळकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, सदा लुडबे, स्वप्नील आचरेकर, सुर्वी लोणे, नीना मुंबरकर, अंजना सामंत, माधुरी प्रभू, रश्मीन रोगे, दिलावर मुजावर, फारूक शेख, गजा नेवाळकर, दीपक कदम, अक्षय भोसले, सचिन गिरकर, अनंत पाटकर, किशोर बावकर, राजा शंकरदास, पॉली गिरकर, सोमा लांबोर, रोशन कांबळी, नरेश हुले, करण खडपे, सिध्देश मांजरेकर, चंदू खोबरेकर, दत्ता पोईपकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.