महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.

खा. विनायक राऊत यांच्या विजयाचा केला निर्धार
सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.कडाक्याचे ऊन असूनही नागरिक उत्साहाने मतदान करत आहेत. शिवसेना- इंडिया-महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या विजयासाठी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असून आज सकाळच्या सत्रात आ.वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला.यामध्ये गोठणे, रामगड, श्रावण, त्रिंबक, पळसंब, चिंदर, आचरा, वायंगणी , हडी, कोळंब, मालवण शहर, कुंभारमाठ आदि ठिकाणी आ. वैभव नाईक यांनी भेट दिली.यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वांनी खा.विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार केला आहे.







