Home स्टोरी मालवण तालुक्यातील २ कोटी ८६ लाखाच्या कामांचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते...

मालवण तालुक्यातील २ कोटी ८६ लाखाच्या कामांचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…!

155

दांडी श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १ कोटी २० लाख

मोरेश्वर रांज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख

चौके बावखोलवाडी रस्त्यासाठी ५ लाख व चौके कुळकरवाडी रस्त्यासाठी ५ लाख रु मंजूर

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते मोरेश्वर मंदिर येथे समुद्र धुपप्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी १ कोटी २० लाख रु. वायरी दांडी येथील मोरेश्वर रांज नाल्याच्या बांधकामासाठी १ कोटी ५६ लाख त्याचबरोबर चौके बावखोलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख रु, चौके कुळकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख रु. हि कामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांची भूमिपूजने शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी असलेल्या या कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

 

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, संमेश परब, दीपा शिंदे, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, माधुरी प्रभू, निनाक्षी शिंदे, सुर्वी लोणे,अंजना सामंत, राजन नागवेकर,विठ्ठल केळुसकर, गणेश आचरेकर,संजू धुरी, विनोद परब,गिरीधर आचरेकर, बाळा खराडे,प्रवीण मेस्त,अरविंद आचरेकर, कांता येरागी,विष्णू जोशी,सूरज लोणे, पायल आढाव,मेघा खराडे, नेत्रा शिंदे,सौ. साटेलकर,मुग्धा खराडे, प्रिया धुरी, देविका परब, कांचन तारी,स्नेहल धुरी, मोरेश्वर रांजनाला येथे मंदार आडकर, सूंदर चांदेरकर, रवी चांदेरकर,उपेंद्र तोडणकर, भाई तारी, रोहन सरमळकर, रोहन चिंदरकर, सचिन आडकर, चंदू खोबरेकर,गणेश भगत, बबलू तारी, सुशांत चांदेरकर, संतोष ढोके, यश चांदेरकर, भाऊ मालंडकर, हिमेश भगत, जयदेव लोणे,चौके कुळकरवाडी येथे रमू चौकेकर, गोट्या सावंत, सुरेश गावडे, उदय गावडे,भाऊ गावडे, श्रीपाद गावडे,राजा नाईक, दादा गावडे, बाबल गावडे, विशाल गावडे, सतीश गावडे, अभिनव सकपाळ आदी उपस्थित होते.

 

चौके बावखोलवाडी येथे ग्रा. प. सदस्य शिवदास मांजरेकर, सुरेश कामत, गोपाळ मांजरेकर, सदानंद मांजरेकर, संतोष जाधव, संतोष कदम, धनंजय वराडकर, गोपाळ पाताडे, सुनील पाताडे, विजय पोळ, विनया पोळ, हर्षल खडपे, सुहास मांजरेकर, महेश जाधव, हेमंत गावडे, प्रणाली जाधव आदी उपस्थित होते.