Home स्टोरी मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे थाटात वितरण     

मालवण तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कारांचे थाटात वितरण     

77

दै.  प्रहारच्या झुंजार पेडणेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ प्रदान.

मालवण प्रतिनिधी: पत्रकारांचा सन्मान करताना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला मालवण तालुका पत्रकार समितीने पुरस्कार दिला हे कौतुकास्पद आणि आदर्शवत असेच आहे. माझ्या सारख्या अनेक राजकीय व्यक्तीना नावारूपाला आणण्यात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. चुकीवर बोट ठेवणे पत्रकारांचे कर्तव्य आहे ते कर्तव्य मालवण पत्रकार नेहमीच आचारणात आणणात. मार्गदर्शक म्हणून सुद्धा पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे. मालवण मधील पत्रकारांनी कधीही आकसा पोटी लिखाण केलेले नाही. पत्रकारांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही राजकारणी यश प्राप्त करू शकलो. आजच्या पुरस्काराच्या कौतुकामुळे पुरस्कार प्राप्त सर्वांची जबाबदारी वाढली आहे. जबाबदारीचे भान ठेवून आपण सर्व काम कराल. असा विश्वास उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे व्यक्त केला.

जिल्ह्यातील पत्रकार चांगलं काम करत आहेत. पत्रकार कै. श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकारणाची सुरवात झाली. त्याकाळी पत्रकारांमध्ये बसून ग्रामीण भागात काय चालले आहे याची माहिती पत्रकार कार्यालयात मिळायची.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पत्रकारांच्या मार्गदर्शनातून मी पुढे गेलो. जिल्हाप्रमुख म्हणून कमी कालावधित यशस्वी झालो. असे सांगत दत्ता सामंत यांनी पत्रकारांचे विशेष कौतुक केले.

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मालवण तालुकाध्यक्ष संतोष गावडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, नंदकिशोर महाजन, जि. कार्य. सदस्य अमित खोत सचिव सौगंधराज बादेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै.भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड हा विशेष पुरस्कार दै प्रहारचे मसूरे प्रतिनिधी झुंजार पेडणेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठाकुर व नितीन आचरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर ‘मालवण रत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या १०० इडीयट ग्रुपला तर कलारत्न पुरस्काराने मालवण येथील साई पारकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विद्याधर केनवडेकर, सदस्यपदी निवड झाल्या बद्दल दै. प्रहार मालवण प्रतिनिधी अमित खोत तर जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल कृष्णा ढोलम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निवृत माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, पुरस्कार घेतल्या नंतर जबाबदारी वाढते. समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकारिते मध्ये बरेच बदल झाले आहेत. सोशल मीडिया शिवाय आपला दिवस जात नाही. त्यामुळे पत्रकारिता करताना अनेक अडचणी आहेत. पत्रकार सुद्धा समाजाचा भाग आहेत असे मानले पाहिजे. 1990 नंतरची पत्रकारिता वेगळी आहे. याच दरम्यान जग जवळ येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. दुरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली. हे बदल स्वीकारत पत्रकारिता वेगळ्या वळणावर आली आहे. अनेक समाज हिताचे व्यापक विचार पत्रकारांनी करणे आवश्यक आहे. समाजाचा आधारस्तंभ पत्रकार आहे. वेगळी बातमी देण्याचा प्रयत्न पत्रकारांनी करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. गणेशोत्सव स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त अनुक्रम पत्रकार प्रफुल्ल देसाई, भाऊ भोगले, दत्तप्रसाद पेडणेकर यांना रोख रकम पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, नंदकिशोर महाजन, युवराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार महेश सरनाईक, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, संदीप बोडवे, आपा मालंडकर, मनोज चव्हाण, अमोल गोसावी, अनिल तोंडवळकर, सुधीर पडेलकर, संतोष हिवाळेकर, नितीन गावडे, अर्जुन बापार्डेकर, परेश सावंत, महेश कदम, भूषण मेथर, पी के चौकेकर, युवराज चव्हाण, भाऊ सामंत, सीझर डिसोझा, प्रसाद बागवे, साईप्रसाद बागवे, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ लक्ष्मी पेडणेकर, सौ प्राजक्ता पेडणेकर, नागेश कदम, परशुराम पाटकर, दीपक पेडणेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक अध्यक्ष संतोष गावडे, सूत्रसंचलन सौगंध बादेकर, सन्मानपत्र वाचन प्रफुल्ल देसाई, अमित खोत तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर, यांनी मानले.