Home स्टोरी मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

29

मालवण प्रतिनिधी: हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व राष्ट्रसंत प. पू पाचलेगांवकर महाराजांचे शिष्य श्रीकांत सावंत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. यावेळी मालवणचे माजी उपनगराध्यक्ष श्री. महेश जावकर, सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे विश्वस्त लक्ष्मण (बाबू) सावंत व सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. नीलम शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत सावंत यांनी सांगितले की हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी भागोजीशेठ किर स्मृती समिती यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी भव्य शोभा यात्रा व अभिवादन सभा संपन्न होत आहे. मालवण तसेच जिल्ह्यातील सकल हिंदू परिवार व मित्रमंडळी यांनी जास्तीत जास्त संख्येने त्यात सहभागी व्हावे. भव्य शोभायात्रा बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता बंगाल केमीकल नाका( सेंच्युरी बाजार)वरळी ते भागोजी किर स्मृतीस्थळ, दादर चौपाटी अशी काढण्यात येणार असून संध्याकाळी ६.३० वाजता अभिषेक व अभिवादन सोहळा असा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन युवा सामाजिक कार्यकर्ते ऐश्वर्य मांजरेकर यांनी केले. सभेच्या आयोजनाला सहकार्य केल्याबद्दल भागोजीशेठ स्मृती समिती उपाध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व दैवज्ञ भवन यांचे विशेष आभार मानले.

या सभेला श्रीकांत सावंत,महेश जावकर, हेमंत करंगुटकर, लक्ष्मण ( बाबू) सावंत, नीलम शिंदे, ऐश्वर्य मांजरेकर यांच्यासह रवींद्र तळाशीलकर, राजेंद्र आंबेरकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, ए.व्ही. गवंडे, भाऊ साळगावकर, पंकज पेडणेकर, संजय गावडे, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, रत्नाकर कोळंबकर, अंकित कोवळे, सुशांत भोजने, आशा वळपी, अंजना दत्तप्रसाद सामंत, क्रांती धुरी, प्रियांका मेस्त्री आदी उपस्थित होते.