Home स्टोरी मालवणातील ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ केला बंद!

मालवणातील ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ केला बंद!

91

मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने प्रशासनाने घेतला निर्णय!

मालवण: मालवणला धुव्वाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण होऊन अनेक घरांना पाण्याने वेढा दिला आहे. अनेक घरात, दुकानात पाणी घुसले आहे. मालवण पेट्रोल पंप देऊळवाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. येथील घरातही पाणी घुसले आहे. दरम्यान खबरदारी उपाययोजना म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पाणी काही प्रमाणात ओसारल्यास वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. अपघात व अन्य धोका टाळण्यासाठी याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी माहिती देताना सांगितले आहे. दरम्यान मालवण बसस्थानक मार्गावरील जलमय स्थिती कायम असून येथील घरे दुकाने पाण्याने वेढली आहेत. मालवण तालुक्यातील जलमय स्थितीबाबत तहसीलदार वर्षा झालटे व पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व प्रशासन लक्ष ठेवून आहेत. माहिती घेऊन अथवा आपत्ती स्थिती ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मदतकार्य उपाययोजना प्रशासन माध्यमातून सुरू आहेत. दरम्यान पावसाचा जोर सायंकाळी उशिरा पर्यत कायम आहे.