मसूरे प्रतिनिधी: मालवण मध्ये सागरी महामार्गावर कोळंब पुलानजीक ‘जलरंग’ या मत्सालयाचा शुभारंभ होत आहे. २० डिसेंबर पासून शोभिवंत मासे फ्लूरोसंट विडो, एंजल्स, टायगर, पिऱ्हाना, किसिंग गुरामी सारखे रंगीबेरंगी आणि विविध आकाराचे मासे तसेच एलीगेटर आणि अर्बना सारखे मोठ्या आकाराच्या माशांचा अद्भुत खजाना पाहण्याची संधी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत मिळणार आहे. पाण्यातील रंगीबिरंगी अद्भुत दुनिया पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन उद्योजक डॉ. दीपक परब, पर्यटन तज्ञ गुरु राणे यांनी केले आहे.