मसुरे प्रतिनिधी: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मसुरे केंद्र शाळेची विद्यार्थिनी इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी मानसी मुकेश परब हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. यावेळी मुकेश परब, गुरुनाथ ताम्हणकर, उमेश खराबी, श्रीमती मगर मॅडम, श्री गावडे सर, विनोद सातार्डेकर आदी शिक्षक, पालक, विध्यार्थी उपस्थित होते.