मसुरे प्रतिनिधी:
कणकवली येथिल शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून ,पुष्प हार अर्पण करून तसेच तसेच कणकवली रेल्वे स्टेशन येथील कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी सोडविण्यासाठी जिल्हा दौरा सुरू झाला असून यादरम्यान ते सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था यांच्या गाठीभेटी घेऊन विकासात्मक विषयांबाबत चर्चा विनिमय करून याबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहेत.
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्वांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य असावे असे आवाहन यावेळी श्रीकांत सावंत यांनी केले आहे.. या कार्यात सहभागी होण्यासाठी श्रीकांत सावंत अध्यक्ष मानवता विकास परिषद 9967050733, 8459492180. येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी यावेळी बच्चू प्रभू गावकर, कणकवली माजी नगरसेवक भाई परब, नागेश मोरये, श्री पोयेकर, श्री कोळेकर, पपी धारगळकर, आशिष खोत, यांनी श्रीकांत सावंत यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.