Home स्टोरी माणगाव विभागातील विविध विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने…!

माणगाव विभागातील विविध विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने…!

175

विकास कामांच्या पूर्ततेबाबत ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार.

सिंधुदुर्ग: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगाव जि. प. विभागातील माणगाव व आकेरी गावात मंजूर केलेल्या विविध कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले

यामध्ये माणगांव ढोलकरवाडी ते पेडणेकरवाडी मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे निधी १९ लाख,माणगाव तांबळवाडी मुख्य रस्ता ते सागर माळकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, माणगाव जोळकवाडी डोंगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, माणगाव डोबेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, माणगाव धुरीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी २६ लाख, आकेरी खालची गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आकेरी गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ८.५० लाख, आकेरी ग्रामपंचायत ते राऊळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख हि कामे आ. वैभव नाईक यांनी मंजूर केली असून या सर्व कामांची भूमिपूजने पार पडली.

यावेळी माणगाव येथे शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, दिपक आंगणे,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर, सरपंच सौ मनीषा भोसले,उपसरपंच बापू बागवे, रमाकांत तामाणेकर,माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,विभाग संघटक कौशल जोशी,उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, युवासेना विभागप्रमुख रुपेश धारगळकर,ग्रामपंचायत सदस्य सौ अनुष्का तेली,सौ मनाली धुरी,श्री संदिप सावंत,कु तेजस्विनी नाईक,सौ पेडणेकर,बंटी भिसे,संजय नाईक,सचिन भिसे,संजय धुरी,कमलाकर धुरी,अजित करमळकर,सचिन तेली,साई नार्वेकर,फीदालीस डॉन्टस,गुरू माणगावकर,सचिन तेली आदि

आकेरी येथे महेश जामदार,गुरुनाथ पेडणेकर, अभय राणे, रुपेश वारंग, प्रमोद घोगळे, किरण वारंग, उमेश परब, राजेश मिस्त्री , राघोबा मिस्त्री , नाना वारंग, गिरीश सावंत, गौरीस नाईक, सूर्या घाडी, मेघा गावडे, रूपाली पेडणेकर प्राजक्ता मिस्त्री , मैत्री पालव, महादेव परब, शंकर जामदार, श्रीपाद परब, उमेश जामदार, संतोष जामदार, संतोष गावडे, अकिरकर सर यांसह शिवसेना,युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.