Home स्टोरी माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघ व श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव यांच्या...

माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघ व श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन संपन्न.

127

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने येत्या महिन्याभरात कॅबिनेट मंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली जाईल. या बैठकीत निश्चितपणे ग्रंथालय कर्मचारी तसेच ग्रंथालयांच्या विकासासंदर्भात चर्चा केली जाईल. शासनाच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवले जातील. अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजपचे नेते जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली. आज ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी खूप आहेत. डिजिटलच्या युगामध्ये आता ग्रंथालयाने आपल्यामध्ये बदल करायला हवा. असा सूर अधिवेशनामध्ये उमटण्यात आला. माणगाव येथे जिल्हा ग्रंथालय संघ व श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयाचे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनाचे उद्घाटन. जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे रणजीत देसाई, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, वासुदेवानंद सरस्वती वाचनालय अध्यक्ष सौ. स्नेहा फणसळकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, सरपंच मनीषा भोसले, सगुण धुरी, अरविंद शिरसाठ, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, सहकार्यवाह विठ्ठल कदम, महेश बोवलेकर, संचालक अनंत वैद्य, संजय शिंदे, भरत गावडे, ऍड संतोष सावंत, ऋतुजा केळकर, उपाध्यक्ष रोजा रिओ पिंटो, गुरुनाथ डवळ, जयेंद्र तळेकर, संजय वेतुरेकर,नंदन वेंगुर्लेकर, प्रवीण भोगटे, सतीश गावडे, प्रसाद दळवी, विजय केसरकर, शरद कोरगावकर, परशुराम चव्हाण, मेघशाम पावसकर, सदाशिव पाटील, एकनाथ केसरकर, शरद कोरगावकर, विजय पालकर, स्नेहा माणगावकर, ग्रंथपाल प्रज्ञा कविटकर, अजित आडेकर, अनुष्का आर्ढेकर, अमोल केसरकर, श्री आणावकर, आत्माराम राऊळ, श्री भिसे, आधी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळा

यावेळी श्री दळवी पुढे म्हणाले आज डिजिटल युग आले आहे. अशावेळी वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. ग्रंथालयामधील पुस्तके वाचायला कुणाला वेळ नाही. अशा स्थितीत ग्रंथालयाने आता शाळांमध्ये विद्यार्थी पर्यंत जाऊन ग्रंथालय चळवळ वाढवायला हवी. असे ते म्हणाले.

पुरस्कार वितरण सोहळा

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री देसाई पुढे म्हणाले ग्रंथालयांची स्थिती काय आहे. याची मला कल्पना आहे. मी दरवर्षी ग्रंथालयांच्या अधिवेशनाला उपस्थित राहतो पण प्रश्न काही सुटत नाहीत. पण आता यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या मनासारखं सगळं आहे. त्यामुळे ग्रंथालयांच्या समस्या अडचणी सोडवल्या जातील. त्यासाठी लवकरच एकत्रित बैठक आमदार खासदार मंत्री यांची घेतली जाईल. असे ते म्हणाले.

पुरस्कार वितरण सोहळा

राज्य ग्रंथालय संघाच्या निवडणुकीमध्ये कोकण विभागातून जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के निवडणुकीला उभे आहेत. कोकणा मधून ग्रंथालय संघाचे नेतृत्व राज्यात करण्याची संधी त्यांना प्राप्त हो. त्यांच्या पाठीशी संपूर्ण भाजप असेल.असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी ग्रंथालयांचा आत्मा हा कर्मचारी आहे आणि कर्मचारी उत्कृष्टपणे काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने शासनाने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत. मात्र आता आपल्या बाजूने सर्व आहे. त्यामुळे पुढील काळात ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या व ग्रंथालयांच्या समस्या निश्चितपणे सुटतील अशी अपेक्षा आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या सुख दुखात नेहमी जिल्हा ग्रंथालय संघ असेल असे ते म्हणाले.

यावेळी सरपंच सौ.भोसले, जिल्हा बँकेच्या संचालक श्री. मोरय यांनी माणगाव मध्ये या ग्रंथालय संघाचे अधिवेशन होत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत आणावकर यांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रास्ताविक माणगाव वाचनालयाचे सचिव एकनाथ केसरकर व जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ यांनी केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य व आत्माराम राऊळ, ग्रंथालय सेवक श्रीमती सुनिता भिसे, दीपक सावंत तर उत्कृष्ट ग्रंथालय साटम महाराज वाचनालय दाणोली तर गोवेरी ग्रंथालय यांना पुरस्कार देऊन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हजारे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सर्व जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांचे कर्मचारी संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे व आभार मानगाव वाचनालयाच्या अध्यक्षा स्नेहा फणसेकर यांनी मानले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघ व माणगाव वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशन निमित्ताने सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थी आधी उपस्थित होते

फोटो: माणगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन मध्ये मनीष दळवी, सचिन हजारे, रणजीत देसाई, मंगेश मस्के, स्नेहा फ णसेकर, मनीषा भोसले, प्रकाश मोरय, भरत गावडे, विठ्ठल सावंत, ऍड. संतोष सावंत, संजय शिंदे, श्री. महेश बोवलेकर आधी.