कुडाळ प्रतिनिधी: माणगावमधील वीज प्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी महावितरणला सूचना करताच महावितरणचे श्री. पाटील यांची माणगाव वीज उपकेंद्राला तातडीने भेट दिली.
माणगाव खोऱ्यातील वीज प्रश्न मिटविण्यासाठी गोठोस येथे वीज उपकेंद्र करण्याचा प्रस्ताव तातडीने येत्या 2 दिवसात पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोठोस येथे उपकेंद्र झाल्यानंतर त्यावरून शिवापूर,निवजे,वाडोस असे एकूण ३ फिडर निघतील. गोठोस उपकेंद्र झाल्यावर वाडोस,निवजे, गोठोस, निळेली, महादेवाचे केरवडे, चाफेली, हळदीचे नेरूर, उपवडे, वसोली, अंजिवडे, शिवापूर या गावांचा ‘डीम हॉल्टेज’ चा प्रश्न मिटेल. आकेरीचा फिडर येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे आकेरी गावचा वीज प्रश्न संपेल, असे श्री. पाटील यांनी सांगून उद्यापासून खराब पोल बदलण्याचे काम चालू करणार असल्याचे सांगितले. ३३ केव्ही आणि ११ केव्ही लाईन वरची झाडे येत्या सोमवारी साफ करून घेतली जातील. तसेच जास्त वेळा परमिट घेणार नसल्याचे श्री. पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शाखा अभियंता श्री. शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार वैभव नाईक यांचे माणगाव खोऱ्यावरील विशेष प्रेम हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.