Home स्टोरी माणगांव खोर्यातील दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे सर्व कॉजवे पाण्याखाली!

माणगांव खोर्यातील दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे सर्व कॉजवे पाण्याखाली!

172

सिंधुदुर्ग(माणगाव): सिंधूदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर असून गेले चार दिवस दुकानवाड ते शिवापूर क्षेत्रातील नदीवरील सर्व कॉजवे पाण्याखाली गेल्यामुळे येथिल ग्रामस्थ,विद्यार्थी आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. एखाद्या वेळेस कोणी आजारी पडला तर त्याच्यावर उपचार होणेही कठीण बनले आहे. माणगाव खोऱ्यातील दुकानवाड, वासोली, आंजीवडे, उपवडे, साकिर्डे, पुळास आदी गावामधे जाण्यासाठी पावसाळ्यात कर्ली नदीवर कमी उंचीचे कॉजवे बांधले आहेत. या भागातील अनेक लोक, विद्यार्थी, व वाहनचालक या कमी उंचीच्या पुलावरून ये जा करतात या भागात डोंगर भाग असल्यामुळे नदीला अचानक पाणी येते.गेली चार ते पाच दिवस दुकानवाड पंच क्रोशितील सर्व कॉजवे पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे.

विशेषतः शालेय विद्यार्थी यांना आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून पायपीट करावी लागत आहे.गेले चार दिवस वादळ सदृश पावसामुळे झाडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे काल उपवडे जि. प.शाळा न.१ चे छप्पर वाऱ्यामुळे तुटून कौले वर्गात पडली मात्र शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी या संकटातून बचावले.दुकानवाड पंचक्रोशीतील या सर्व कमी उंचीच्या कॉजवेची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.