सावंतवाडी (माडखोल): गावाबाहेरील व्यक्तीचा माडखोल गावातील वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासह याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपला गाव आपला विकास या संकल्पनेतून माडखोल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी माडखोल गाव विकास संघटनेची स्थापना बैठकीत करण्यात आली. या संघटनेमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे माडखोल गावाच्या विकासाचे आणि नियोजनाचे धोरण माडखोल गाव विकास संघटना ठरविणार आहे.
माडखोल देवस्थानचे प्रमुख मानकरी दत्ताराम राऊळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत माडखोल गाव विकास संघटनेचे प्रमुख म्हणून दत्ताराम तुकाराम राऊळ, आनंद पुंडलिक राऊळ, चंद्रकांत म्हालटकर, राजकुमार लक्ष्मण राऊळ, संजय मुकुंद राऊळ, माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, बाबू डिसोजा, चंद्रकांत घाडी-परब यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच शृष्णवी सुयोग राऊळ, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ ग्रामपंचायत सदस्य विजय सावळाराम राऊळ, दीप्ती दीपक राऊळ, अनिता अनिल राऊळ, सरिता बाळकृष्ण राऊळ, प्रज्ञा उल्हास राणे, जान्हवी जानू पाटील आदी उपस्थित होते.
माडखोल गाव विकास संघटना गावाच्या सर्वांगीण विकासालाच प्राधान्य देणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा हक्काचा निधी गावाला देण्यास टाळाटाळ होत असेल तर ही संघटना लोकशाहीच्या मार्गाने लढा उभारून शासनास हा निधी देण्यास भाग पाडणार आहे. तसेच जिल्हा नियोजनकडे गावातील विकास कामांचे प्रस्ताव पाठवूनही दबावाच्या राजकारणामुळे फेटाळण्यात आले. त्यामुळे यापुढेही या विरोधात ही संघटना लढणार आहे. तसेच माडखोल गावातील विविध निर्णय व धोरणाबाबतची गावाबाहेरील व्यक्तीची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संघटनेचे प्रमुख राजकुमार राऊळ यांनी सांगितले.
गावाच्या हिताच्या दृष्टीने या संघटनेसाठी महादेव धुरी, बाबू जाधव, बंड्या म्हालटकर, आनंद म्हालटकर, न्हानू राऊळ, बंटी सावंत, बापू घाडी, संतोष मेस्त्री, रमी मेस्त्री, मंगेश राऊळ, प्रकाश देसाई, मधुकर राऊळ, उल्हास राणे, गुरु सावंत, श्री चिले, पिन्या ठाकूर, भाऊ तायशेटे, जानू पाटील, नवलू येडगे, बाळा देसाई, राजन नाईक, जीवन केसरकर, बाबा लातये, रोहित गोताड, विश्वास राऊळ, विनोद ठाकूर, सुभाष पालव, प्रकाश राऊळ गुरु राऊळ, वासुदेव राऊळ, गोपी जाधव, संतोष राणे, पप्पू शेटकर, सुयोग राऊळ, विजय कोठावळे, दाजी राऊळ, पप्पू राऊळ, पप्पू गावडे, संतोष राऊळ, अवि राऊळ, बाबुराव उर्फ आप्पा राऊळ, साईनाथ होडावडेकर, संतोष घाडी प्रदीप घाडी, अरविंद घाडी, नाना मेस्त्री, विशाल लातये, राजन बाळकृष्ण राऊळ, दाजी खाडये, स्वप्निल राऊळ, बाली म्हालटकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संघटनेच्या पाठीशी राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.