Home शिक्षण माडखोल केंद्राचा बाल कला – क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न….!

माडखोल केंद्राचा बाल कला – क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न….!

268

सावंतवाडी: माडखोल केंद्राचा बाल कला – क्रीडा महोत्सव दिनांक 7/12/2023 रोजी केंद्रशाळा माडखोल येथे आणि 8/12/2023 रोजी कारिवडे पेडवे नं 2 या शाळेत अतिशय नियोजनबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये कारिवडे पेडवे नं. 2 च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

 

खो-खो लहान गट मुले प्रथम क्रमांक, खो-खो लहान गट मुली, मोठा गट मुली आणि मोठा गट मुले द्वितीय क्रमांक, कबड्डी मोठा गट मुले प्रथम क्रमांक, गोळा फेक प्रथम क्रमांक (खेमराज अलबा घाडी ), रिले 50×4 मुले द्वितीय क्रमांक, 100 मीटर धावणे मुले प्रथम क्रमांक – शुभम प्रदीप केळुसकर.

 

ज्ञानी मी होणार.!’ मोठा गट प्रथम क्रमांक – भदू सत्यवान परब, तनिष्का प्रतापराव गवळी. समुहगान, समुहनृत्य मोठा गट प्रथम क्रमांक.,  समुहनृत्य लहान गट द्वितीय क्रमांक.

 

या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले नैपुण्य दाखवले. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे केंद्रस्तरीय जनरल चॅम्पियनशिप उपविजेता होण्याचा मान शाळेला प्राप्त झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. ऐश्वर्या पोकळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती,पालक वर्ग, ग्रामस्थ यांच्याकडून भरभरून कौतुक होत आहे. केंद्रप्रमुख श्री. रामचंद्र वालावलकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरापर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

या दोन्ही दिवशी पार पडलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ शाळा कारिवडे पेडवे नं. 2 येथे संपन्न झाला. याप्रसंगी कारिवडे गावच्या सरपंच आरती माळकर, उपसरपंच नितीन गावडे तसेच सर्व सदस्या साक्षी परब, भाग्यश्री भारमल, माडखोल ग्रामपंचायतचे सदस्य श्री. कोळमेकर, शाळा व्यवस्थापन समिती कारिवडे पेडवे नंबर 2 चेअध्यक्ष नितीन गावडे, उपाध्यक्ष विजय परब, शिक्षणतज्ज्ञ गोविंद परब तसेच सर्व सदस्य व पालक तसेच माडखोल केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. वालावलकर, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.