Home राजकारण माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली शरद पवार आणि जयंत पाटील...

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट!

173

सावंतवाडी प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला. यावेळी श्री पवार यांनी तुम्ही सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्यासोबत आहात याचे मला समाधान आहे. असेच पाठीशी राहा. तसेच श्री पाटील यांनी पक्ष बळकट करायचा आहे सर्वांनी पुन्हा जोमाने कामाला लागा असेही सूचित केले