सावंतवाडी प्रतिनिधी: माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज त्यांनी काल बुधवार दि.११ ऑक्टोबरभरून सावंतवाडी उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाकडे सादरही केला आहे. मृत्यू पश्चात आपल्या शरीराचा उपयोग एखाद्या व्यक्तीला व्हावा या दृष्टीने त्याने हा निर्णय घेतला आहे. श्री आरेकर कुटुंबीय नेहमीच सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांच्या मदतीसाठी धावत असते. श्री आरेकर यांनी सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून त्यांनी बुधवार दि.११ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील रुग्णालयात जाऊन तसा अर्जही दाखल केला. त्यामुळे आरेकर यांचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे