सावंतवाडीत आयोजन : बबन साळगावकर याच्या हस्ते उद्घाटन..!
सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर उद्या रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता सुरू होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे.या क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर याच्या हस्ते माजी नगरसेवक व पत्रकार याच्या उपस्थितीत होणार आहे.
सावंतवाडीतील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर हलक्या चेंडू चे क्रिकेट सामने होत आहेत यात माजी नगरसेवक व पत्रकार सहभागी होणार आहेत.हे मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने होणार आहेत.मैदानावरची तयारी पूर्ण झाली असून माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी मैदानाची पाहाणी केली
दरम्यान रविवारी या सामान्यांचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवक ज्येष्ठ पत्रकार याच्या उपस्थितीत होणार आहे.तरी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन वारंग यांनी केले आहे.