Home स्टोरी माजी खासदार निलेश राणे आणि दत्ता सामंत खरे देवदूत…

माजी खासदार निलेश राणे आणि दत्ता सामंत खरे देवदूत…

457

माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून मसुरे देऊळवाडा तुरी वांयगणी येथील मंदिरास पन्नास हजाराची मदत…..

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा तुरी वांयगणी येथील वशिक विठ्ठल रखुमाई आणि गणपती मंदिरास माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या सहकार्यातून मंदिर बांधकामास रोख 50 हजार रुपयांचा निधी नुकताच मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर आणि येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आला. या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले असताना या मंदिराला अत्यावश्यक कामासाठी निधीची आवश्यकता होती. याबाबत मसुरे येथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने दत्ता सामंत यांनी येथील ग्रामस्थांची व मंदिर बांधणाऱ्या सर्व सदस्यांची गरज लक्षात घेता मंदिराचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत थांबू नये यासाठी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोख रुपये पन्नास हजाराचा निधी दिल्याचे सांगितले. तसेच येथील ग्रामस्थांच्या कठीण प्रसंगात भारतीय जनता पक्ष तसेच माजी खासदार डॉक्टर निलेश राणे आणि आपण स्वतः कोणतेही राजकारण न करता सदैव मागे राहू असे आश्वासनही दत्ता सामंत यांनी यावेळी दिले.

यावेळी मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर यांनी या मंदिराच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. तसेच महेश बागवे यांनी सुद्धा मधुकर प्रभू गावकर यांच्या कार्याचे यावेळी कौतुक केले. याप्रसंगी मधुकर प्रभुगावकर, महेश बागवे, छोटू ठाकूर, शिवाजी परब, अशोक बागवे, जितेंद्र परब,संतोष पालव, विलास मेस्त्री, आबा तुरी, मंगेश तुरी, पंकज तुरी, अभिजीत तुरी, दिनकर परब, निलेश लाड, शैलेश लाड, शरद लाड, सुभाष लाड ,ओमकार लाड, संदेश परब, सिद्धेश परब ,अक्षय परब ,स्वप्निल तुरी, रतराज तुरी, प्रमोद लाड, जयेश लाड ,प्रकाश राणे, बंटी राणे,गणेश परब, नारायण लाड, सौ स्मिता परब, अक्षता परब, प्रियांका परब ,सुप्रीती तुरी, शिवाजी बाबू परब, पुरुषोत्तम शिंगरे,प्रमोद परब आणि येथील स्थानिक ग्रामस्थ, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे,

दत्ता सामंत तसेच भारतीय जनता पक्षाच्या या दानशूर पणाबद्दल येथील ग्रामस्थांनी कौतुक करून निलेश राणे आणि दत्ता सामंत हे खरे देवदूत आहेत आणि त्यांचे आभार व्यक्त केले. या मंदिराच्या बांधकामाच्या समस्येबाबत माजी उपसभापती छोटू ठाकूर, शिवाजी परब, तसेच माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, विलास मेस्त्री यांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते.