गोवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांना गोव्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात माजी आमदार राजन तेली यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरूण नोकरी-धंद्यानिमित्त जवळच्या गोवा राज्यावर अवलंबून आहेत. खासकरून अनेक वाहनचालक गोव्यात परमिटच्या गाड्या चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, त्यांचे वाहन परवाने MH 07 अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा पासिंग असल्याने गोवा आरएटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे. त्यामुळे या वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनचालकांना नाहक भुर्दंड बसत असल्यामुळे त्यांना योग्य तो दिलासा मिळावा ही विनंती.
यावेळी सोबत प्रदेश उपाध्यक्ष श्री.प्रथमेशजी तेली, श्री.शेखर गावकर, श्री. प्रीतेश राऊळ, श्री. संजय सातार्डेकर, युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष श्री. पराशर सावंत, श्री.देवेंद्र शेटकर उपस्थित होते