सावंतवाडी प्रतिनिधी: आई देवी माऊली युवक मित्र मंडळ तिरोडा आयोजित माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर साहेब पुरस्कृत चषकाचे काल उद्घाटन करण्यात आले व आज बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार जीजी उपरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत एड्रीयल स्पोर्ट्स संघाने प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच माऊ स्पोर्ट्स यांनी द्वितीय पारितोषिक पटकवत उत्तुंग अशी कामगिरी केली.
आयोजक मनोज कांबळी पंकज, पेडणेकर, ओमकार गावडे, विजय उर्फ अण्णा गावडे, दादा पालकर, हर्षद केरकर, अनिकेत पटेकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आशिष सुभेदार यांनी आभार मानत पुढील वर्षी माजी आमदार उपरकर साहेबांच्या माध्यमातून तिरोडा गाव मर्यादित अजून भव्य दिव्य अशी तिरोडा गाव मर्यादित मॅचेस भरवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. माजी आमदार जीजी उपरकर व आयोजन केलेल्या सर्व सहकारी मित्रांचे मंदार नाईक यांनी आभार मानले.