सावंतवाडी प्रतिनिधी: माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय तर्फे घेण्यात आलेल्या निबंध वकृत्व हस्ताक्षर अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत प्रथम प्रिया सुतार, वकृत्व स्पर्धेत तनया कासार, रंगभरण स्पर्धा पारस गाड, हस्ताक्षर स्पर्धा नागराज कुरुमकर यांनी पटकावले. जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे भक्षच वितरण समारंभ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ अर्चना सावंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तथा साहित्यिक लेखिका उषा परब, तालुका अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, एडवोकेट नकुल पारसेकर, उपसरपंच संतोष वेजरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, मीरा कासार, एस. बी. सावंत, आर. के. सावंत, बी. एस. चौरे, लोकेश कानसे, श्री गुंजाळ, सिद्धेश कानसे, ग्रंथालय कर्मचारी मधु कुंभार, माया साळगावकर आधी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत द्वितीय रिद्धी दळवी, तृतीय सुजाता राट, उत्तेजनार्थ ऋतुजा निबरे, वकृत्व स्पर्धेत द्वितीय गितेश सुतार, तृतीय प्राची गुरव, उत्तेजनार्थ पल्लवी गुरव
रंगभरण स्पर्धा द्वितय स्मिता चौरे, तृतीय सिया राणे, उत्तेजनार्थ पार्थ गावडे
हस्ताक्षर स्पर्धा द्वितीय त्रिशा शेटकर, तृतीय जानवी बागले, उत्तेजनार्थ ऊर्वी टकेकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण साहित्यिका लेखिका उषा परब, अर्चना सावंत, एडवोकेट संतोष सावंत, एडवोकेट नकुल पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी ग्रंथालयामार्फत विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. अशा स्पर्धांमध्ये गावातील सर्व प्राथमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा स्पर्धा गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने घेतल्या जात आहेत आणि अशा स्पर्धा यापुढेही घेतल्या जातील. श्लोक पठण बाबत त्यांनी उपक्रम राबविला असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी सूत्रसंचालन लोकेश कानसे यांनी केले. वकृत्व स्पर्धेचे परीक्षण शीतल सावंत व सिद्धेश कानसे यांनी केले.
निबंध परिक्षक म्हणून श्वेतल परब आणि शितल सावंत यांनी काम पाहिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.
फोटो: सावंतवाडी माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देताना ग्रंथालयाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, लेखिका उषा परब, एडवोकेट नकुल पार्सेकर, सरपंच सौ. अर्चना सावंत, मीरा कासार, संतोष वेदरे, एस. बी. सावंत, आर. के. सावंत, बी. एस. चौरे, लोकेश कानसे, सिद्धेश कानसे, मधु कुंभार, माया साळगावकर, ऋतुजा निबरे आधी.
छाया: भारत फोटो स्टुडिओ