Home स्टोरी माजगावसह चराठा गावाला केला जाणारा वीजपुरवठा राहणार ठप्प…!

माजगावसह चराठा गावाला केला जाणारा वीजपुरवठा राहणार ठप्प…!

93

सावंतवाडी: वीज महावितरण कंपनीच्या माजगाव विज उपकेंद्राच्या अत्यावश्यक कामासाठी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ पर्यंत या वीज उपकेंद्रातून माजगावसह चराठा गावाला केला जाणारा वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.

माजगाव विज उपकेंद्राच्या या अत्यावश्यक कामामुळे या उपकेंद्रातून माजगावसह उद्यमनगर व चराठा गावाला होणारा विजपुरवठा सुमारे पाच तास बंद राहणार आहे. याची उद्योजक, लघुउद्योजक तसेच या दोन्ही गावातील ग्राहकांनी नोंद घ्यावी आणि विज महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता के ए चव्हाण यांनी केले आहे.