Home स्टोरी माऊलींचा वैभवशाली पालखी सोहळा!

माऊलींचा वैभवशाली पालखी सोहळा!

142

१५ जून वार्ता: वारी म्हटलं की, लाखो वारकऱ्यांचा संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या नामांचा जयजयकार, विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि अभंगात तल्लीन झालेले वारकरी असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. देवभक्तीच्या स्वरांनी भक्तीमय झालेल्या वारकऱ्यांसह संतांच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने ११ जून रोजी प्रस्थान केलं. त्यानंतर आज ही पालखी दिवे घाटातून जात आहे. दिवे घाटातून पालखी जात असताना वारकऱ्यांचा उत्साह काही वेगळाच असतो. विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेले वारकरी अतिशय उत्साहाने हा घाट चढतात. या घटातील वारीचं दृश्य पाहाणं ही एक अविस्मरणीय पर्वणी असते. जे वारकरी या वारीत सहभागी झाले, त्यांना याची देही याची डोळा याचा अनुभव घेता येतो.परंतु ज्यांना वारीत सहभागी होणं शक्य झालं नाही. त्यांनाही या वारीच्या दृष्याचा अनुभव घेता येणार. हा संपूर्ण वारी सोहळा कव्हर करणाऱ्या ‘दिंडी’च्या टीमने दिवे घाटातील वारीचं विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. या टीमने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेलं हे दृश्य पाहून तुम्हालाही या दिंडीत सहभागी झाल्याचा अनुभव नक्की येईल.

यंदा आषाढी एकदाशी २९ जून रोजी आहे. या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठू माऊलीच्या भेटीने लाखो वारकरी दिंडीत पायी चालत पंढरपूरमध्ये दाखल होतात. आषाढी एकदाशीला चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेतात.