Home स्टोरी मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे पूल बांधण्याचा आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द...

मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे पूल बांधण्याचा आ. वैभव नाईक यांनी दिलेला शब्द केला पुर्ण

144

३ कोटी ८३ लाख ६३ हजार रु. निधीतून पुलाचे झाले बांधकाम.

आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

सिंधुदुर्ग: गेली कित्येक वर्षे कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे नदीवर मोठे पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती. दोन वर्षापूर्वी येथील ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांनी पूल बांधण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द त्यांनी पुर्ण करत ग्रामस्थांची मागणी पुर्ण केली आहे. आ. वैभव नाईक यांनी नाबार्ड २०२०-२१ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मळावाडी रस्ता ग्रा. मा. ४३० वर ०/३०० किमीमध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ८३ लाख ६३ हजार रु. निधी मंजूर केला असून पुलाचे काम पूर्ण झाले आहे. काल बुधवारी आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली.तसेच उर्वरित कामाचा आढावा घेत अंदाजपत्रक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पूलाचे बांधकाम झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय आता टळली आहे. त्याबद्ल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीम. नार्वेकर,शाखा अभियंता श्री. पाटील, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर मांडकुली सरपंच गौतमी कासकर, तातू मुळीक, दत्तात्रय खानोलकर, संतोष पेडणेकर, गौरेश पिंगुळकर, निलेश सामंत, महादेव मुळीक, दिलीप निकम, निलेश सामंत, सचिन ठाकूर, संतोष परब, अशोक परब, प्रकाश परब, बाबाजी भोई, श्री नार्वेकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.