कल्याण प्रतिनिधी(आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील विजय नगर मधील सेंट थॉमस या शाळेने नुकतीच सरसकट ३५ टक्के फी वाढ जाहीर केली होती, त्या मुळे पालक वर्गात मोठ्या प्रमाणावर या फि वाढी विरोधात आक्रोश निर्माण झाला होता. या फि वाढी विरोधात मा.नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी मध्यस्ती करून शाळा प्रशासनाने कोविड काळामधील वाढवण्यात आलेली फी वाढ रद्द करण्यास भाग पाडले. कोवीड कालावधीतील फी वाढ रद्द केल्याने पालक वर्गाने महेश गायकवाड यांचे आभार मानले आहेत. सेंट थॉमस या शाळेने कोवीड कालावधी सह या वर्षी सरसकट ३५ टक्के फी वाढ केल्याने पालक वर्गात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. या बाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना देऊन सदरची भरमसाठ फी वाढ कमी करण्याबाबत विनंती केली होती. या नंतर महेश गायकवाड यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन फी वाढ संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा करून पंधरा टक्के फी वाढ कमी करण्याचे सांगितले होते.त्या प्रमाणे एकूण फि वाढी पैकी पंधरा टक्के वाढीव फी शाळा प्रशासनाने कमी करत असल्याचे मान्य केले आहे .ही १५ टक्के फी वाढ कमी केल्यामुळे पालक वर्गाने महेश गायकवाड आणि स्कूल प्रशासनाचे आभार मानले आहेत .