म्हसळा: (संजय खांबेटे): कर्जत-खालापूरचे (जिल्हा रायगड) आमदार महेंद्र थोरवे यांचे ५० व्या वाढदिवसा निमीत आपले मनोगत व्यक्त करताना,वाढदिवसाचे व्यासपीठा वरून राजकीय टीका- टिपणी करणार नसल्याचे सांगत त्यानी रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री कु. आदीती तटकरे यांच्या विरूध्द पातळी सोडून असंसदीय भाषेत केलेल्या टिकेची आम्ही म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडीसह निषेध करीत आसल्याचे अध्यक्ष समीर बनकर यानी जाहीर केले, यावेळी उपस्थितानी आमदार थोरवें बाबत निषेधाच्या घोषणा देऊन नाराजी व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस महादेवराव पाटील .नगरअध्यक्ष अकमल कादिरी, नगरपंचायतीचे गटनेते संजय कर्णिक,अल्पसंख्यांक समाजाचे नेते शाहीद उकये, माजी सभापती संदीप चाचले, महीला जिल्हा चिटणीस रेश्मा कानसे ,महीला अध्यक्षा सोनल घोले,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, नगरसेविका जयश्री कापरे, नगरसेविका दळवी, महीला शहर चिटणीस वैशाली घोसाळकर, मराठा समाजाचे नेते नाना सावंत .अनिल बसवत,गजानन पाखड,किरण पालांडे, नदिम दळवी,प्रकाश गाणेकर,स्वप्नील चांदोरकर, महमद पठाण, घोले आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार, माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या बाबतीत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अपशब्द बोलुन जाहीर वक्तव्य केले.त्यांच्या या वक्तव्याचा म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पत्रकार परिषदेत जाहिर निषेध करण्यात आला.तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी शहर संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजीत करून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा तीव्र शब्दात घाणाघाती टिका करुन निषेध केला. तालुका अध्यक्ष समीर बनकर यांनी भुमिका मांडताना राज्यात राजकीय सत्तांतर घडल्यापासून महिलांवर बेताल वक्तव्य करणे थांबण्याचे नाव काही घेत नाही. यात अग्रस्थानी शिवसेनेचे सत्ताधारी आमदार व मंत्री आहेत हे आश्चर्याचेच आहे असे बनकर यानी स्पष्ट आरोप केले.बनकर यानी आमदार थोरवे यानी तात्काळ माफी मागावी अन्यथा आम्ही त्याना चोख उत्तर देऊ असेही ठणकाहून सांगितले अन्य कार्यकर्ते आणि महीलाही यावेळी प्रयंड अक्रमक झाल्या होत्या.फोटो :
Home राजकारण महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष समीर बनकर यांच्या नेतृत्वा...