सावंतवाडी: समाज उपयोगी प्रशिक्षणे, उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली समानवता ट्रस्टने यावर्षीचा जागतिक महिला दिन प्रत्यक्ष महिलांसाठी कार्य करून साजरा करण्याचे ठरविले आहे. महिला सक्षमीकरण उद्दिष्ट ठेवून समानवता ट्रस्टच्या वतीने 8 फेब्रुवारी पासून महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये नवजात शिशु पासून बालकांचे कपडे, लहान मुलींचे फ्रॉक, वेगवेगळ्या आकाराच्या कापडी पिशव्या, आकर्षक कापडी पर्स बनविण्याचे आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरचे प्रशिक्षण समानवता ट्रस्ट कार्यालय सातरल कणकवली येथे एक महिना चालणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी 82 75 67 32 27 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे सचिव कमलेश गोसावी यांनी केले आहे.