Home स्टोरी महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

90

मुंबई: शिवराज्यभिषेक सोहळ्याचे ३५० व्या वर्षात पदार्पण होत आहे. याचेच औचित्य साधत ३५० दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग नमस्ते फॉउंडेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन संचालक‍ बी.एन.पाटील उपस्थित होते. आज सकाळी ऑगस्ट क्रांती मैदान ते दादरच्या सावरकर स्मारक पर्यंत ही रॅली काढण्यात आली.