Home राजकारण महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू! नाना पटोले

महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू! नाना पटोले

78

१७ मे वार्ता: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसत्ताला दिलेली मुलाखत मी वाचली. मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही मुलाखत पाहिली. या सगळ्या दृष्टीने समोर येऊन तिघांनी मिळून ठरलेलं धोरण सांगत असताना यांच्या स्वतंत्र मुलाखती मात्र वेगळं दर्शवत आहेत. असं माझं निरीक्षण आहे. असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु कुणी त्याचा चुकीचा अर्थ लावत असेल तर त्यावर इलाज नाही. अजूनपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही. माध्यमांच्या चुकीच्या बातम्या, तसेच काही बातम्यांचा चुकीचा अर्थ लावून असा गैरसमज निर्माण केला जात असेल तर ते चुकीचं आहे. जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची आमची भूमिका आधीपासून अशीच आहे. सर्वांचीच ती भूमिका आहे. त्याने गैरसमज करून घेण्यात काही अर्थ नाही. महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू. असं नाना पटोले म्हणाले.