सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य चिंतामणी तोरसकर यांनी आदर्श विद्यार्थी घडवितांना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्षपद भूषविताना शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरावर काम केले. तसेच त्यावेळी कोलगाव सारख्या ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणाची सोय होण्यासाठी दिलेले योगदान सर्वज्ञात आहे. त्यामुळे चिंतामणी तोरसकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे केलेले कार्य संस्मरणीय असून चिरकाल टिकणारे आहे. अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चिंतामणी तोरसकर यांना श्रद्धांजली वाहिली.
कळणे तसेच कोलगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चिंतामणी तोरसकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोलगाव माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेला मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष शांताराम गावडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव रामचंद्र घावरे, भरत सराफदार, सावंतवाडी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत सावंत, बांदा येथील अन्वर खान, रामगीरी बुवा, अनिल नाईक, राजा गावडे, रविकिरण तोरसकर, पूनम नाईक, सुहास सावंत, कोलगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद मेस्त्री, शिक्षक रामचंद्र मेस्त्री, प्रशांत चव्हाण, संगिता महापुरे, माजी सरपंच लाडू जाधव, भागोजी पाटील, मयुरी टिळवे, मुक्तद्वार ग्रंथालयाच्या माधुरी नाईक, मयुरी रजपूत,माजी विद्यार्थी संदेश राऊळ, प्रशांत गोवेकर, रंजिता गोवेकर, रेश्मा गोवेकर, संकेत नाईक, संगिता सावंत पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी शांताराम गावडे यांनी चिंतामणी तोरसकर यांनी मुख्याध्यापक महामंडळाच्या राज्य स्तरावर केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. रामचंद्र घावरे यांनी मुख्याध्यापकांच्या अनेक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी चिंतामणी तोरसकर यांनी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. यावेळी अन्वर खान यांनी चिंतामणी तोरसकर यांच्या कॉलेज जीवनासह शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. अरविंद मेस्त्री यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर चिंतामणी तोरसकर यांनी सहकाऱ्यांना सोबत घेत कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करीत या गावात हायस्कूल सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाची सोय केल्याचे सांगितले. पुनम नाईक यांनी चिंतामणी तोरसकर शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कोलगाववासियांच्या कायम स्मरणात राहणार असून त्यांचे हे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी रामगीरी बुवा, लाडू जाधव यांनीही चिंतामणी तोरसकर यांच्या आठवणींना दिला.