सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, नेते श्री शिरीष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यातील असंख्य महिलांना तसेच महिला बचतगटांना एकदिवसीय राखी मेकिंग तसेच ज्वेलरी मेकिंग चे प्रशिक्षण मनसेच्या माध्यमातून देण्यात येणार असून या मधून दरडोई उत्पन्न मिळून देवगड तालुक्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सबल करण्याचा आमचा मानस आहे.
तरी येत्या २० मे ला सकाळी १० वाजल्यापासून दिवसभर हे प्रशिक्षण शिबीर देवगड बर्वे लायब्ररी-एसटी डेपो च्या मागे या ठिकाणी संपन्न होणार असून या शिबिरास असंख्य महिलांनी उपस्थित राहून या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करत आहोत