Home स्टोरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगडच्या वतीने ई स्टोर व ग्रामीण कुटा फायनांस या...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगडच्या वतीने ई स्टोर व ग्रामीण कुटा फायनांस या दोन कंपनींची चौकशी येत्या सात दिवसात करण्याची विनंती!

134

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगडच्या वतीने १५ मार्च रोजी तालुक्यातील महिला बचत गटांना ग्रामीण कुटा फायनांस या प्रायव्हेट फायनांस कडून कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी जे त्या कंपनीचे कर्मचारी दरदिवशी घरी जाऊन मानसिक त्रास देत आहेत, त्या बद्दल देवगड तहसीलदार मा. स्वाती देसाई यांना निवेदन देण्यात आले,तसेच ई स्टोर व ग्रामीण कुटा फायनांस या दोन कंपनींची चौकशी येत्या सात दिवसात करण्याची विनंती करण्यात आली, तसेच ग्रामीण कुटाचे कर्मचारी या महिलांच्या घरी जाऊन दागिने विका,घर गहाण ठेवा,मोठमोठयाने दरवाजात ओरडणे ,तुमचा आधार कार्ड, मतदान कार्ड लॉक केला जाईल,तुमचे सिबील खराब केले जाईल, तुम्हाला चक्रवाढ व्याज लावले जाईल, अशा प्रकारे मानसिक त्रास दिला जातो,असे सर्व महिलांनी तहशीलदार स्वाती देसाई यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या,तसेच यावर येत्या सात दिवसात वरील संस्थांची चौकशी करावी,नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपल्या पध्दतीने आपले काम करील..असे मनसेचे संतोष मयेकर यांनी तहशीलदार यांना सांगितले आहे…तसेच दोनशे महिलांचे सहयांचे निवेदन देण्यात आले,याबाबत कोणाची तक्रार असेल तर या नंबर वर संपर्क साधा..संपर्क क्रमांक 8169657795..त्यावेळी तेथे महाराष्ट्र सैनिक बबलू परब तसेच सौ अनुश्री तावडे,रोहिणी चव्हाण, योगिता खोत ,राजश्री लाड,संचिता घाडी,प्रांजल टेंबुलकर ,सुहासिनी प्रभू,सुचिता माळकर,श्री शेडगे उपस्थित होते,