सावंतवाडी प्रतिनिधी: मराठी भाषेचाचा गौरव करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठी राज्यभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२४ रोजी कु. साईल तळकटकर, कु. नाईक कुमार, कु. प्रतीक मालवणकर कु. रसिका पालव यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा सावंतवाडी तालुका व वेंगुर्ला तालुक्यामध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्यामधून २३६ मुलांनी सहभाग घेतला होता. वेंगुर्ला तालुक्यामधून या स्पर्धेमध्ये १६८ मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये तीन क्रमांक व तीन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले आहेत. लवकरच विजेता मुलांना पारितोषिके व सहभागी मुलांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
WPS Office: Complete office suite with PDF editor
Here’s the link to the file:
https://in.docworkspace.com/d/sIMDk9oTYAZ3S368G
Get WPS Office for PC:
https://www.wps.com/d/?from=t