Home स्टोरी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी दीपक परब यांची...

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी दीपक परब यांची निवड!

171

मसुरे प्रतिनिधि:(पेडणेकर): महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे चांदेर गावचे सुपुत्र, प्रसिध्द उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.गेली अनेक वर्ष डॉक्टर दीपक परब हे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यामध्ये उल्लेखनीय असे कार्य करत होते. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेला विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी दीपक परब यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. याची दखल घेऊन डॉक्टर दीपक परब यांची उपाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे अध्यक्ष श्री ललित गांधी आणि कल्लाप्पा आण्णा जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते डॉक्टर दीपक परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उपाध्यक्ष नितीन बंग, भालचंद्र राऊत, मनोज वालावलकर, महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे नूतन सदस्य दत्तप्रसाद पेडणेकर, सीमा शहा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर दीपक परब हे विविध संस्थांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये अध्यक्ष पद भूषवित असून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष पद भूषविताना शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. उद्योग क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेला भविष्यामध्ये सर्वांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून कोकण विभागातून जास्तीत जास्त संस्थेचे सभासद करण्याचा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर या संस्थेला गर्व वाटेल असे काम करण्याचा मानसनूतन उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. डॉक्टर दीपक परब यांच्या अभिनंदन निवडी बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मसुरे ग्रामस्थ, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांनी अभिनंदन केले आहे.