Home स्टोरी महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल संपादकपदी वामन तर्फे यांची एक मताने निवड.

महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल संपादकपदी वामन तर्फे यांची एक मताने निवड.

111

६ जुलै वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ६जुलै २०२४ रोजी सुशिल रसिक सभागृह सोलापूर या ठिकाणी महामंडळाचे अध्यक्ष श्री.जे के पाटील (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ.श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.महामंडळाच्या अध्यक्षपदी श्री.तानाजी माने(सोलापूर), सचिवपदी श्री.नंदकुमार सागर(पुणे), कोषाध्यक्ष श्री.संदेश राऊत (रत्नागिरी) व श्री वामन तर्फे यांची महामंडळाचे मुखपत्र एज्युकेशनल जर्नल यांच्या संपादकपदी एकमताने निवड झाली.महामंडळाचे हे प्रमुख पदाधिकारी असून यांचा कालखंड २०२४ ते २०२७ असा राहणार आहे.महाराष्ट् एज्युकेशनल जर्नल हे मुख्याध्यापक संघ महामंडळाचे शैक्षणिक आणि संघटनात्मक विचारांचे व्यासपीठ असणारे मासिक असून यामध्ये प्रसिद्ध होणारे विचार आणि लेख यांची शासन स्तरावर शैक्षणिक धोरण ठरवताना प्रामुख्याने दखल घेतली जाते.अशा या शैक्षणिक व्यासपीठाचे संपादक होण्याचा बहुमान त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक महामंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते श्री.वामन तर्फे यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.श्री.वामन तर्फे हे सुरुवातीपासूनच सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघामध्ये सक्रिय असून संघाच्या निष्ठापूर्वक कार्यामुळे तसेच एखाद्या कामात झोकून देऊन ते काम चिकाटीने पुर्ण करण्याच्या वृत्तीमुळे जिल्हा संघाच्या अध्यक्षपदा पर्यंत पोहचले . विशेषतः कोरोनाकाळापासून मुख्याध्यापक महामंडळाशी समन्वय ठेऊन जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांचा विशेष सक्रिय सहभाग दिसून आला.त्यांचा प्रचंड जनसंपर्क असून शैक्षणिक सामाजिक संघटनात्मक कार्यात ते नेहमीच सक्रिय असतात.श्री. वामन तर्फे यांच्या सर्वांशी समन्वय साधून काम करण्याच्या भुमिकेची दखल घेऊन राज्य महामंडळाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री.एम जी मातोंडकर सर, मुख्याध्यापक संघ महामंडळाचे मा.सहकोषाध्यक्ष श्री.रामचंद्र चावरे, जिल्हा संघाचे सचिव श्री.गुरुदास कुसगांवकर तसेच कोकण विभाग शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी अभिनंदन केले आहे.महामंडळाच्या या मुखपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी यापूर्वी राज्यातील अनेक नामवंत मुख्याध्यापकांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष मा.श्री.सुरेश गवस सर यांनी सांभाळली होती.महाराष्ट् राज्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत मुख्याध्यापकांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या निवडीमुळे श्री.वामन तर्फे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.आपल्याला मिळालेले प्रतिष्ठेचे पद हे जिल्ह्यातील मुख्याध्यापक बंधु-भगिनींचा सन्मान असून याचे श्रेय जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना आहे असे मत श्री.वामन तर्फे यांनी व्यक्त केले.