मुंबई: श्री संजय बनसोडे यांची सर्वानुमते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संजय बनसोडे सर यांची एक चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. सतत सक्रीय राहून अंधश्रद्धा चळवळीस सक्रीय ठेवण्यात त्यांचा फार मोठा हातभार लागला आहे. जे करायचे ते स्वच्छ व पारदर्शक करायचे ही सरांची खासीयत आहे. त्यांच्या अविश्रांत कामाची ही पोहोच आहे.त्यांच्या या दैदिप्यमान निवडीबद्दल वाळवा तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी संस्था,संघटना आणि चळवळींच्यावतीने नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुमार केतकर (ज्येष्ठ संपादक) माजी खासदार हे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी श्री विश्वास सायनाकर (माजी प्राचार्य) उपस्थित राहणार आहेत.
सोहोळ्याचे निमंत्रक प्रा. शामराव पाटील (अध्यक्ष, नागरी सत्कार समिती) आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी संघटना आहेत. शनिवार दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता, बी. के. पॅलेस, मल्टीपर्पज हॉल, ताकारी रोड, इस्लामपुर येथे हा समारंभ पार पडणार असुन सदर समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे संयोजक यांनी आवाहन केले आहे.