Home राजकारण महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो….. विरोधी...

महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो….. विरोधी पक्ष नेते अजित पवार

161

शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नसेल, तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. माझा प्रश्न आहे की, शशिकांत वारिशेंच्या कुटुबीयांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आलीये का? काही जाहीर केलेलं आहे का? रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे, अशी शंका येते. आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे?”पंढरीनाथ आंबेरकरने दिलेल्या जाहिराती अजित पवारांनी सभागृहात दाखवल्या. त्यानंतर ते म्हणाले, मी पण सरकारमध्ये काम केलं आहे. तुमच्या वरिष्ठांचे फोटो त्याने लावले आहेत. तुम्ही तपासू एसआयटी लावली आहे. त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका. अशी लोकं कुणाचीच नसतात. आमचं सरकार असतं, तर आमचा उदो उदो केला असता. त्याकरिता स्पष्ट सूचना द्याव्या लागतील.

पत्रकार शशिकांत वारिशे

असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होते . त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. मास्टरमाईंड कोण आहे? ते बघितलं तर त्याने जाणीवपूर्वक केल्याचं दिसतंय. एसआयटीचा पोलीस उपअधीक्षक आहे. शरद पवारांनी एका प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्याला तपास दिला होता. तशाच पद्धतीने राज्यातील प्रामाणिक अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे. यात राजकीय हस्तक्षेप झाला नाही, तर व्यवस्थित तपास होऊ शकतो. याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. पत्रकारितेला अडचणीत आणणारं आहे. दबावाला बळी न पढता सूचना अधिकाऱ्यांना देणार का? असं अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी २५ लाख रुपये मदत जाहीर केली आणि दिली देखील आहे. जे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. माझं, मुख्यमंत्र्यांचं बॅनर त्याने लावलं होतं. याचा कोणताही दबाव पोलिसांवर नाही. तात्काळ या व्यक्तीला अटक केली. ३०२कलम त्यावर लावलं. एसआयटी नेमली आहे. वरिष्ठांना त्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. आता पोलीस महासंचालकांना सांगेन की त्यांनी स्वतः सगळ्या पोलिसांना सूचना द्याव्यात. या नीच कृत्याप्रकरणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तपास झाला की, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये घेण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत. जेणेकरून तात्काळ निकाल लागावा.”