Home स्टोरी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते?

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते?

136

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र केलं तर या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार राहणार नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही जयंत पाटील सुरात सूर मिसळला आहे. कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला आहे. तर कोर्ट या संदर्भात योग्य निर्णय घेईल अशी आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील वादावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच गृह खात्यावरही निशाणा साधला आहे. या शिवाय संभाजी नगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचंही म्हटलं आहे. या सभेसाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. या सभेला मोठी गर्दी होणार आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि गृहमंत्र्यांची आहे. त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.