Home स्टोरी महाराष्ट्रात बॅनरवर अतिक अहमदचा शहीद म्हणून उल्लेख

महाराष्ट्रात बॅनरवर अतिक अहमदचा शहीद म्हणून उल्लेख

234

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड, माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी ‘ऑन कॅमेऱ्या’समोर बेछूट गोळीबार केला. यामध्ये दोघेही जागीच मृत पावले. या घटनेनंतर देशभरात एकच चर्चा सुरु आहे. हे दोघे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. पण आता याच अतिक अहमदचे बॅनर महाराष्ट्रात लागले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. अतिक अहमद आणि त्याच्या भावाची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफला गोळ्या झाडून ठार केले. पण आता महाराष्ट्रातील बीडमधील माजलगाव शहरात भर चौकात अतिक अहमदचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे बॅनरवर अतिक अहमदचा शहीद म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.