Home राजकारण महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होईल! भविष्य प्रकाश आंबेडकरांचं भविष्य

महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होईल! भविष्य प्रकाश आंबेडकरांचं भविष्य

75

१८ मे वार्ता: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत गौप्यस्फोट करत महाविकासआघाडीच्या भवितव्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काँग्रेसने बरेच ठिकाणी स्वतंत्र जाऊ, अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादीमध्ये अजून बरंच राजकारण घडायचं आहे, असं मी मानतो. त्यानंतर जे काही बाहेर पडेल, ते खरं बाहेर पडेल, त्याच्यामुळे वेट ऍण्ड वॉच,’ असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ‘मी मागच्यावेळी तुम्हाला म्हणालो होतो दोन बॉम्ब फुटतील, दोन बॉम्ब फुटले. अजून काही घडणार आहे, ते घडू द्या, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होईल,’ असं भविष्य प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. महाविकासआघाडीमध्ये मतभेद आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, आघाडीतल्या मतभेदांपेक्षा नवीन समिकरणं उभी राहतील, अशी परिस्थिती आहे. नवीन समिकरणं उभी राहीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण स्थिर होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट प्रकाश आंबेडकर यांना मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातून उमेदवार करण्यासाठी इच्छुक आहे, याबाबतही प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘ती जागा आमच्याकडेच होती, रामदास आठवले तिथूनच निवडून आले होते. नंतर ती जागा आम्ही सोडून दिली होती, त्यामुळे नवीन नाहीये. त्या जागेवर प्रभाव आहे. मागणार का नाही मागणार, हे त्यावेळेस ठरेल. अजून यामधलं राजकारण व्हायचं आहे, समिकरणं आज दिसत आहेत, तशीच राहतील असं सांगता येत नाही. यामध्ये काही जण गळतील काही जण नव्याने येतील, अशी परिस्थिती आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.