Home स्टोरी महापालिकेच्या “९/आय” प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच

महापालिकेच्या “९/आय” प्रभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई सुरूच

120

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडीवली, ढोकली गाव येथील सुरू असलेल्या अनधिकृत चाळीच्या (१३ रुम), ३ टपऱ्या आणि ८ जोत्यांवर (फाउंडेशन) निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभाग व फेरीवाला हटाव कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबी व ५ कामगार यांच्या साहाय्याने करण्यात आली.